सर्वांचे लाडके आप्पासाहेब  उर्फ विजय विसपुते

आप्पासाहेब  म्हणजे विजय विसपुते , एक लोभस , निरागस , कुटुंब वत्सल व्यक्तिमत्व . जणू महात्मा  फुले यांच्या सुगंधित विचारील बागेतील उत्तोमोत्तम फुल. आप्पासाहेब  खरे म्हणजे अनेक मूळ भारतीय विचार मंच कार्यकर्त्यात वयाने लहान तरी सर्व त्यांना आबासाहेबच म्हणायचे . त्यांचे आई वडील , एक लहान भाऊ , एक आते भाऊ  आणि सुस्मित. सदावत्सल त्याची धर्म पत्नी असा त्यांचा परिवार कल्याण कोडसेवाडी इथे राहायचा . तसे ते मूळ चे जळगाव चे , वडिलोपार्जित सोनाराच्या व्यवसाय . शिक्षण घेऊन , बायलर तंत्र शिकून ते मुंबई उपजिविके साठी आले , सामाजिक मान्यते ने लवकर लग्न करून ते कल्याण ला आले मिळे तेथे खाजगी कमानीत नौकरी स्वीकारली , भाऊ बी कॉम शिकत होता , आते भाऊ इंजिनीरिंग करून नौकरी शोधण्यासाठी आला होता असा हा सर्व कौटम्बिक संसाराचा पसारा एका दहा बाय बारा  च्या खोलीत शिवाय आमचे सारखे किती तरी सामाजिक कार्यकर्त्यांचे त्यान्च्या कडे येणे जाणे , आणि अगत्य पूर्ण , चहापान जणू हा त्यांच्या घरचा नित्यक्रमच झाला होता !

नेटिविस्ट डी डी राऊत तेव्हा कल्याण पूर्वेत बहुजन एडुकेशन फौंडेशन  ऑफ इंडिया या संथचे संस्थापक अध्यक्ष होते , नवीन इंग्रजी माध्यमाची प्राथमिक शाळा काढली होती नाव होते पेरियार रामास्वामी इंग्लिश स्कूल . मेश्राम नावाचे बी एस एन एल मधून डावी. इंजिनीर च्या जिम्मी बाग परिसरात ४ खोल्या २० हजार डिपोषित देऊन घेतल्या होत्या तिथे अनेक मानवर शाहू  महाराजांच्या जयंती चे दिनी शाळेचे करपे यांच्या घरी मोठ्या हाल वर केले होते . बहुजन या उक्ती प्रमाणेच संस्थेत, ब्राह्मण सोडून इतर जातीचे २० सदस्य होते , एन एस जगजापे  संस्थेचे  सचिव , ए जि आफिस मध्ये अकाउंट्स ऑफिसर होते तर नेटिविस्ट राऊत , आई  टी आई  मध्ये अकाउंट्स / ऑडिट आफिसर . जोधे , तलमले  तेली समाजाचे होते तर गोन्नाडे कोष्टी समाजाचे होते . कोळी समाजाचे होते तर तामिळनाडूचे   एक इंजिनेर होते , मेश्राम , माटे, एल एन  खापर्डे,
अशी  हि बहुजन मंडळी

शाळेला कायम विनाअनुदान तत्वावर शासकीय मान्यता चौथी पर्यंत , सातवी पर्यंत चा पर्याय खुला पण मुळेच मिळेनात . वर्गात ५ , १० , १५ ,, २० मुले , फी सर्व शाळेपेक्षा कमी , सोयी नुसार द्या एवढी शिथिलता , मारिया , नायर , एलिझाबेथ , सॅन्ड्रा ,  मोरे सारखे चांगले इंग्रजी , मॅथ्स चे शिक्षक , खुद्द नेटिविस्ट ची दोन्ही मुले याच शाळेत जेणे करून विश्वास बसावा आम्ही विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ देणार नाही . पण विश्वास ठेवेल तो बहुजन समाज कसला ? रास्ता वाढी इमारत पाडली, आम्ही रस्त्यावर आलो , तीन वर्ष्या पूर्वी अनाथपिंडक सुरू केले दहा अनाथ मले, एक माउली ठेवली स्वतःच्या खर्चाने दहा मुलाचा घरी ठेवून सुद्धा सांभाळ केला पण विस्वास ठेवणार तर तो बघून समाज कसला . हो डॉक्टर शेळके निशुल्क तपासायचे तर  डॉक्टर दिलीप मेंढे कुटुंब कधी या पोरांना जेवायला बोलवायचे . सिंधी , मराठा , महार , मातंग अश्या समाजातील हि मुले होती . सरकारी ४० हजाराचे अनुदान मान्य झाले अट  ५०० चौरास फूट बांधकाम असलेली ४ खोलीचे ठिकण दाखवा . कुठन आणायची ? शाळेला जागा नाही , अनाथ मुलांच्या गृहाला जागा नाही , वरून सदश्यची माल्लीनाथी , तुम्हाला कोणी सांगितले होते हे करायला ! तुम्ही पाहत बसा ! आम्ही सही करणार नाही , ऑडिट लांबणीवर , विलंब अस्या किती तरी समश्या ! त्या वेळी संस्थेत साधे सदस्य हि नसलेले विजय विसपुते म्हणजे जिवलग मित्र , आपले दुःख सांगा ते निदान एकूण घेऊन दिलासा देतील याचे कारण म्हणजे नेटिविस्ट चे चाललेले निरगर्वीष्ठ समाज कार्य ते मूळ भारतीय विचार मंच , ब्लू व्हील क्रॉस अश्या संघटनेत आणि नेटिव्ह पीपल्स पार्टी च्या स्थापने पासून  त्यांनी कोषाध्यक्ष म्हणून सांभाळलेली जबाबदारी  व त्यानून निर्माण झालेला विश्वास होता .

आप्पासाहेब  विसपुते नेहमीच नेटिविस्ट डी डी राऊत , गुरुवर्य प्राध्यापक डॉक्टर भीमराव गोटे यांच्या खांद्याला खांदा लावून , एकटे नव्हे तर सह कुटुंब उभे राहिले ते नेटिव्ह रुल मोव्हमेन्ट चे कोणतेही काम असो त्यात ते संस्थापक म्हणून राहिले . ब्लू व्हील क्रॉस हि नैसर्गिक आपत्ती जसे पूर , भूकंप  , मानवी अत्याचार , जाळपोळ , जातीय , धार्मिक भांडणे यात होरपडणारा बघून समाज या साठी निर्माण केली होती , डॉक्टर दिलीप मेंढे यांनी सुद्धा निशुल्क रोग निदान शिबिराला बाबा साहेब उद्यान येथ आपली सेवा दिली आहे . आम्ही मुद्दाम  निळी हाप पॅन्ट व पांढरी ती शार असा ब्लू व्हील क्रॉस चा ड्रेस ठेवला होता . समजा कार्यात लाज कसली हा आमचा विस्वास आहे त्या वेळी आम्ही दहा ची एक युनिट केली होती आणि सकाळी दादासाहेब उद्यानात हाप पॅन्ट घालून जात असू . संघटनेत त्याग आणि निसंकोच असले पाहिजे हे अप्पासाहेब  वीसपुतेंचे मत होते .

विजय विसपुते पुढे एका शासकीय कंपनीत बायलर विभागात नौकरी का लागले आणि मागील वर्षी निवृत्त झाले . त्यांचं लहान बंधू के डी एम सि मध्ये कामाला आहेत आते ते सर्व वेळ समज कार्याला देतात . मुलगा डॉक्टर झाला आहे मुलगी ग्रॅज्युएट होऊन पुढे शिक्षण  घेत आहे , विसपुते ताई हसत मुखाने यजमानाच्या समाज सेवेला यथा शक्ती हातभार लावत असतात , त्याच्या कडे येणारे जाणारे , मित्र परिवार अजून वाढलेले आहे हे त्यांच्या प्रेमळ वृत्ती मुळे .

मध्यंतरीच्या काळात समाज माध्यमावर टाकलेल्या एका माहितीवर लाईक करून कॉपी केल्यामुळे कोणीतरी तिवारी नावाच्या माणसाने एफ  इ आर करून त्यांचे वर गुन्हा नोंदविला विषय , माहिती  जुनी आहे , सत्य आहे पण डोक्याला त्रास . गोटे सर , नेटिविस्ट राऊत नि त्यांना काहीच दिवस पूर्वी सांगितले . घाबरू नका , मी टाकतो ती पोस्ट , करू द्या माझेवर काय ती कारवाई . सत्याला भीती कसली ! फुलेंचे वारीस घाबरत नसतात ! असे हे आमचे आप्पासाहेव विजय विसपुते नेटिव्ह पीपल्स  पार्टी चे संस्थापक कोषाध्यक्ष अजूनही ठाम आहेत अढळ आहेत कारण ते आप्पा साहेब आहेत !

नेटिविस्ट डी डी राऊत
 

Comments

Popular posts from this blog